पुणे -1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देखील कोरोना लस मिळणार असल्याची घोषणा केंद्राने केली होती. त्यानुसार आता 1 मे पासून, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 18 वर्षे ते 44 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 ठिकाणी 1 मे ते 7 मे या कालावधीमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, परंतु या कालावधीमध्ये जिल्ह्यामधील सर्वच लसीकरण केंद्रांवरती लसीकरण होणार नसून, प्रत्येक तालुक्यातील एक व पुणे कटक मंडल अशा एकूण 14 ठिकाणी लसीकरण होणार आहे. मात्र लसीकरणासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असून, फक्त 100 जणांनाच लस देण्यात येणार आहे. दरम्यान लाभार्थ्यांनी नोंदणी केंद्रांवर गर्दी न करता ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.
या केंद्रांवर होणार लसीकरण
आंबेगाव उपजिल्हा रुग्णालय मंचर
बारामती महिला रुग्णालय बारामती
भोर उपजिल्हा रुग्णालय भोर
दौंड उपजिल्हा रुग्णालय दौंड
हवेली प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर
इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्र पळसदेव