पुणे - दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. हा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी विद्यापीठातच आंदोलन केले.
दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला आणि यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलन पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी निषेध सभा आयोजित करून आंदोलन केले. या आंदोलनात युवक काँग्रेस एनएसयूआई, युक्रांद, भारती विद्यार्थी मोर्चा या संघटनाही सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - पुण्यातील कोंढव्यात सात मजली इमारतीला भीषण आग