महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्ग: पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी - पाटस टोलनाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Pune-solapur Highway
पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

By

Published : Jan 16, 2020, 1:33 PM IST

पुणे - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांची २ किलोमीटर तर पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची पाटस गावातील ब्रीजपर्यंत रांग लागली होती.

पाटस येथील टोल नाक्यावर शासन नियमानुसार रोख रकमेसाठी स्वतंत्र लेन आणि फास्टटॅगसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था करण्यात आली आहे. रोख रकमेसाठी दोन्ही बाजूला एक-एक लेन ठेवण्यात आली आहे. तर इतर सर्व लेन फास्टटॅगसाठी ठेवण्यात आल्या. फास्टटॅग नसणारे वाहन जर फास्टटॅगच्या लेनमध्ये गेले तर त्या वाहनाला शासन नियमानुसार वाहनाला दुप्पट टोल द्यावा लागत आहे. दुप्पट रकमेची पावती त्या वाहन चालकांना दिली जात आहे.

पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

फास्टॅग नसणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने , रोख रकमेच्या लेनवर जास्त वाहने झाल्यामुळे पाटस टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली. पाटस टोल नाक्याजवळूनचा मार्ग दौंडकडे जातो. या मार्गाला वाहने आडवी असल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. दौंडकडून येणाऱ्या आणि दौंडकडे जाणारी वाहने बराच वेळ अडकून पडली. वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वाहने विरुद्ध दिशेने टोल नाक्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते.

पाटस येथील टोल नाक्यापासून पुढे बारामती फाटा आहे. या फाट्यावर वाहने उभी असल्याने बारामतीकडे जाणारी वाहने आणि बारामती बाजूकडून पाटस बाजूकडे येणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकली. वाहनचालकांना मोठा त्रास यामुळे सहन करावा लागत आहे. पाटस टोल नाक्यावरील सर्व्हिस रोड आणि पुणे बाजूकडील दुचाकीच्या मार्गावर चारचाकी वाहने असल्याने दुचाकीस्वरांना जायला मार्ग राहिला नसल्याची स्थिती निर्माण झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details