महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून पुण्यात बहीण भावाने छापल्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा

सुनीता प्रदीप रॉय (वय 22) आणि दत्ता प्रदीप रॉय (वय 18, दोघेही रा. घोटावडे फाटा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. बहीण भावाला हाताशी धरून बनावट नोटा छापत होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश पंढरीनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

By

Published : Sep 16, 2020, 5:16 PM IST

Updated : Sep 17, 2020, 7:55 PM IST

पुणे बनावट नोटा न्यूज
पुणे बनावट नोटा न्यूज

पुणे - यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून बनावट नोटा छापणाऱ्या बहीण आणि भावाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 100 रुपयांच्या 34 बनावट नोटा, दोन प्रिंटर, कागदी रिम हस्तगत करण्यात आले आहे. यूट्यूबवर बनावट नोटांचा व्हिडिओ पाहून त्यांनी 100 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचे पोलिसांना कबुली दिली आहे. या प्रकरणी त्यांना अधिक तपासासाठी भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सुनीता प्रदीप रॉय (वय 22) आणि दत्ता प्रदीप रॉय (वय 18, दोघेही रा. घोटावडे फाटा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. बहीण भावाला हाताशी धरून बनावट नोटा छापत होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश पंढरीनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात युट्युब वरील व्हिडिओ पाहून बहीण भावाने छापल्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदरनिर्वाह भागवण्यासाठी आरोपी सुनीता आणि भाऊ दत्ता हे दोघे घरातच प्रिंटर आणि स्कॅनरचा वापर करून शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापत होते. त्या बाजारात खपवण्यासाठी शक्कल लढवत पुण्यातून थेट भोसरी येथील भाजी मंडई गाठली. तेथे भाजी खरेदी करत असताना बनावट शंभर रुपयांची नोट संबंधित व्यक्तीला दिली. नोट बनावट असल्याचा संशय भाजी विक्रेत्याला आला. त्यांनी सुनीताला जाब विचारला. तेवढ्यात काही महिलांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपी सुनीताला पकडून बेदम चोप दिला. मात्र, तरीही सुनीता तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. दरम्यान, सोबत असलेल्या भावाला सर्वांनी धरून ठेवले. आरोपी दत्ता ला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा, हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, भावाच्या मदतीने बहीण सुनिता हिलाही अटक करण्यात आली. आरोपीच्या पुण्यातील घरी 100 रुपयांच्या 34 नोटा, दोन प्रिंटर, कागदी रिम, असा एकूण 34 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेच्या अधिक तपासाठी त्यांना भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 17, 2020, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details