पुणे- नरेंद्र दाभोलकर खून खटल्यातील संशयित आरोपी विक्रम भावेंचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विक्रम भावे यांच्या जामीन अर्जास विरोध करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने हा निर्वाळा दिला.
दाभोलकर खून प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला विक्रम भावेंचा जामीन अर्ज - vikram bhave
बचाव पक्षाच्या वतीने विक्रम भावे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला होता. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने विक्रम भावे यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने विक्रम भावे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
यासंदर्भात बचाव पक्षाचे वकील विरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, यापूर्वी सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या आरोप पत्रामध्ये अन्य आरोपी विरुद्ध नरेंद्र दाभोळकर खून खटल्यामध्ये गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत. मात्र, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
त्याचबरोबर सीबीआयच्या तपासामध्ये अनेक विसंगती असल्यामुळे खटल्यातील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे विक्रम भावे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा युक्तिवाद, बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये करण्यात आला आहे. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने विक्रम भावे यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाने विक्रम भावे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.