महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यपालांचे आजचे पत्र हे पूर्णपणे भाजपा प्रेरित' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील मंदिरे खुली करण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावरून राज्य सरकार आणि भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांमध्ये सुरुवात झाली आहे.

ulhas bapat
उल्हास बापट

By

Published : Oct 13, 2020, 7:15 PM IST

पुणे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आजचे पत्र हे पूर्णपणे भाजपा प्रेरित आहे. ते सौजन्याला धरुन नाही. राज्यपालांचे आतपर्यंतचे वागणे हे राज्यपालपदाची प्रतिमा दिवसेंदिवस कमी करत आहे, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरूद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक सामना बघायला मिळाला. मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वावरून डिवचले आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनीही आपले मत व्यक्त केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जो आज पत्रव्यवहार झाला आहे तो चुकीचा आहे. आपल्या राज्यात संसदीय पद्धत आहे. त्यानुसार राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असते. त्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी वागायचे असते. मात्र, राज्यपाल नेमणे हे पंतप्रधानांच्या हातात असते. यामुळे राज्यपाल हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कारभार करतात. हे आपण इंदिरा गांधींच्या काळापासून आपण पाहत आलो आहे. हीच प्रक्रिया मोदींच्या काळातही सुरू आहे. राज्यपालांचे आजे पत्र हे पूर्णपणे भाजपा प्रेरित आहे. राज्यपालांचे आजचे पत्र हे सौजन्याला धरुन नाही. राज्यपालांचे आतपर्यंतचे वागणे हे राज्यपालपदाची गनिमा दिवसेंदिवस कमी करत आहे असं स्पष्ट मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.

भाजपाचे जे धोरण आहे, त्याप्रमाणे राज्यपाल काम करत आहेत. घटनेची जी शपथ घेतली आहे, त्याची आठवण करून राज्यपालांनी पंचांसारखी भूमिका बजावली पाहिजे. एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असणे हा सन्मानाचा भाग आहे. तो गुन्हा नाही. त्यामुळे राज्यपालांनी केलेला प्रश्नच चुकीचा होता, असेही बापट म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details