महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्यापासून संरक्षण करणारी प्लास्टिकची तोफ!

आंबेगाव तालुक्यातील राजणी गावात शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलाने बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. अमन भंडारी याने मोठा आवाज करणारी एक तोफ बनवली आहे.

प्लास्टिकची तोफ
प्लास्टिकची तोफ

By

Published : Dec 22, 2019, 5:27 PM IST

Updated : Dec 22, 2019, 8:33 PM IST

पुणे - बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या किंवा मानवी हस्तक्षेपामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडतात. आंबेगाव तालुक्यातील राजणी गावात शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलाने बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. अमन भंडारी असे या मुलाचे नाव आहे.

बिबट्यापासून संरक्षण करणारी प्लास्टिकची तोफ


अमन हा नरसिंह विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. त्याने बिबट्यापासून संरक्षण मिळण्यासाठी प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून मोठा आवाज करणारी तोफ तयार केली आहे. बिबट्या आणि मानवातील वाढलेला संघर्ष लक्षात घेऊन त्याने ही तोफ बनवली.

हेही वाचा - 'अशा जगाची प्रतिक्षा जिथे मी सुरक्षित राहू शकेल', 'बिग बीं'च्या नातीचं दमदार सादरीकरण

घरातील खराब झालेले पीव्हिसी पाईपचे तुकडे, कॅल्शियम कार्बाइड, पाणी आणि लायटरचा वापर करून तयार केलेली ही तोफ फटाक्यांपेक्षाही मोठा आवाज काढते. अमनच्या या अनोख्या कल्पनेला त्याच्या शिक्षकांनी पाठिंबा दिला, त्यामुळे त्याची कल्पना सत्यात उतरली.


विज्ञान प्रदर्शनात भाग घेवून अमनने या तोफेचे प्रात्याक्षिकही दाखवले आहे. वनविभागानेही त्याच्या या उपकरणाचे कौतुक केले. बिबट्या हा मोठ्या आवाजाला घाबरणारा प्राणी आहे. मोठा आवाज ऐकल्यानंतर बिबट्या ती जागा लगेच बदलतो, त्यामुळे या तोफेचा वापर करून आपले संरक्षण करणे सहज शक्य होणार आहे.

Last Updated : Dec 22, 2019, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details