पुणे - कोरोनाचे निर्बंध धुडकावत फार्म हाऊसवर डान्सपार्टी करणाऱ्या तरुण तरुणींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. भोर तालुक्यातील केळावडे गावातील फार्म हाऊसवर डान्सपार्टी चालू असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी फार्म हाऊसवर छापा टाकून सात तरुण आणि सहा तरुणींवर कारवाई करण्यात आली आहे.
फार्म हाऊसवर डान्सपार्टी : पुण्यातील राजगड पोलिसांची कारवाई; तेरा जणांवर गुन्हा दाखल
फार्म हाऊसवर डान्सपार्टी करणाऱ्या तेरा जणांच्या विरोधात कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत. तसेच अनेक जणांची चौकशी चालू आहे. तर असे प्रकार चालू असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी केले आहे.
गुन्हा दाखल
भोर तालुक्यातील केळावडे गावातील फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टम लावून तसेच विविध रंगीबेरंगी लाइट्स लावीत तरुण-तरूणी डान्स करत होते. फार्म हाऊसवर डान्सपार्टी करणाऱ्या या तेरा जणांच्या विरोधात कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत. तसेच अनेक जणांची चौकशी चालू आहे. तर असे प्रकार चालू असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी केले आहे.