पुणे -शहरात गुरुवारी दिवसभरात ४ हजार १०३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. शहरात दिवसभरात २ हजार ७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात कोरोनाबाधीत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील १४ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात ८२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख ७३ हजार ४४६ झाली आहे. तर सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३५ हजार ८४९ इतकी आहे आणि आतापर्यत एकूण मृत्यू ५ हजार ३३७ तर आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २ लाख ३२ हजार २६० झाले आहेत. शहरात गुरूवारी २० हजार ६९१ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत एकूण ५ लाख ३४ हजार ४११ रुग्णांपैकी ४ लाख ६२ हजार ६९७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ६१ हजार ८३२ आहे. कोरोनाबाधित एकूण ९ हजार ८८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण १.८५ टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ८६.५८ टक्के आहे.