महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नायलॉनचा मांजा विक्री केल्यास होणार कारवाई, पोलिसांचा इशारा - पुणे संक्राती बातमी

मकरसंक्रातीनिमित्त शहरातील विविध भागात पतंगोत्सव साजरा केला जातो. पण, नायलॉनच्या मांजामुळे पक्षी, व्यक्तींना मोठी इजा होते. नायलॉनच्या मांजामुळे जीव गेल्याच्याही घटना घटल्या आहेत. यामुळे स्थानिक पोलिसांनी दुकानदारांना नायलॉन मांजाची विक्री करु नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

मांजा
मांजा

By

Published : Jan 4, 2021, 10:42 PM IST

पुणे - मकरसंक्रातीनिमित्त शहरातील विविध भागात पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी बंदी असलेल्या मांजाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना मांजा कापल्याने अपघाताच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी नायलॉनचा मांजाची विक्री करू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजाची विक्री कारवाई करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

...अन्यथा दुकानदारांवर कठोर कारवाई

नायलॉनच्या मांजामुळे काही महिन्यांपूर्वी शहरात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय काहीजण जखमी देखील झाले होते. त्यामुळे बंदी असताना देखील मांजा विक्री केली जात असल्याचे दिसून आले होते. विशेषतः उपनगर भागातील दुकानात मांजा विक्री केली जात असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार काही दुकानांवर पोलिसांनी कारवाई देखील केली होती. यावर्षी नायलॉनचा मांजाची विक्री होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यासाठी दुकानदारांना स्थानिक पोलीस ठाण्यांमार्फत अगोदरच सूचना दिल्या आहेत. नायलॉनच्या मांजाची विक्री केली तर दुकानदारांना कठोर कारवाई केली जाणार आहे. गुन्हे शाखेकडून देखील मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर लक्ष ठेवले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details