महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कब्रस्तानमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी मृतांच्या कबरीवर केली फुले अर्पण - pune latest news

कोरोनाच्या काळात पुणे पोलिसांनी एक अभिनव उपक्रम केला. त्यांनी कोंढव्यातील शब ए कद्र या कब्रस्तानमध्ये जाऊन मृतांच्या कब्रवर फुले अर्पण करून प्रार्थना केली.

Pune police
पुणे पोलिसांनी मृतांच्या कब्रवर केली फुले अर्पण

By

Published : May 21, 2020, 9:27 PM IST

पुणे -कोरोनाच्या काळात पुणे पोलिसांनी एक अभिनव उपक्रम केला. त्यांनी कोंढव्यातील शब ए कद्र या कब्रस्तानमध्ये जाऊन मृतांच्या कब्रवर फुले अर्पण करून प्रार्थना केली. शब ए कद्र म्हणजे पवित्र रमजान महिन्याची मोठी रात्र असते. या रात्री मुस्लीम बांधव कब्रस्तानमध्ये जाऊन कब्रवर फुल अर्पण करतात.

पुणे पोलिसांनी मृतांच्या कब्रवर केली फुले अर्पण


रमजान महिन्यात 26व्या रोजा दिवशी शब ए कद्र असते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात फुले अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाला हा उपक्रम राबवला. शब ए कद्रच्या रात्री मुस्लिम बांधव कब्रस्तान मध्ये जाऊन कब्रवर फुल अर्पण करतात. परंतू, मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details