पुणे - भाजपचे आमदार गिरीश महाजन ( BJP MLA Girish Mahajan ) यांच्यावर पुण्यात असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहे. ( Pune Police Team in Jalgaon ) जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station ) गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल -
कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे. जळगावात पाच संशयितांच्या घरी चौकशी सुरू असून कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले आहे. पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्त्वात पाच पथके तयार करण्यात येऊन या पथकाकडून स्वंतत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.