पुणे- कोरोनाबाबतचे नियम सर्वांनी पाळणे अतिशय गरजेचे असून अन्यथा राज्यात या आजारामुळे हाहाकार माजेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मास्क वापरून कोरोना दूर ठेवण्याबाबतचे आवाहन करण्यासाठी पुणे पोलिसांकडून एक व्हिडिओ शेअर केला आहे. मास्क न घालण्यासाठी अनेक कारणे लोक सांगत असतात. मात्र, हा व्हिडिओ पाहून कोणाकडे काही कारण शिल्लक राहील असे वाटत नाही.
'मास्क घातल्यावर खूप गरम वाटते, त्यामुळे मी मास्क घालू शकत नाही, मास्क न घालण्यासाठी तुम्ही हे शब्द नुकतेच वापरले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, असे लिहून पुणे पोलिसांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हात, डोळ्यांनी अपंग असलेले लोकही कशी मास्क घालत आहेत, हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणी मास्क न घालण्याचे कारण देऊ, नये असा संदेश त्यांनी व्हिडिओमधून दिला आहे.