पुणे - शहरातील डेक्कन येथील उच्चभ्रू परिसरात हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरू होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी तेथे छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 10 जणांना आणि जुगार चालवणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
टिप मिळाल्यावरुन पोलिसांची कारवाई
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, डेक्कन परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी पोरवाल इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना या ठिकाणी काही नागरिक जुगार खेळताना आढळले. तेव्हा 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुले अशी जुगार चालवणाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख 20 हजार आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
डेक्कन परिसरात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 12 जणांवर गुन्हा - पुण्यात जुगार अड्ड्यावर रेड न्यूज
शहरातील डेक्कन येथील उच्चभ्रू परिसरात सुरू असणाऱ्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 10 जणांना आणि जुगार चालवणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
डेक्कन परिसरात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 12 जणांवर गुन्हा