पुणे - शहराच्या इतिहासामध्ये पुणेरी पाट्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. कारण समाज माध्यमांच्या आगमनापूर्वी अनेक दशकं पुणेकरांनी याच पुणेरी पाट्यांद्वारे वैविध्यपूर्ण मतं खुलेपणाने मांडली होती. मात्र, नेहमी मनोरंजनाचा विषय ठरणाऱ्या या पुणेरी पाट्यांचा उपयोग आता पुणे पोलिसांकडून प्रबोधनासाठी करण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांकडून प्रबोधनासाठी नाविन्यपूर्ण पुणेरी पाट्यांचा उपयोग - traffic
पुणे शहर पोलिस आणि भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांमध्ये जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण पुणेरी पाट्या तयार करण्यात आल्या आहेत. नेहमीच मनोरंजनाचा विषय ठरणाऱ्या या पुणेरी पाट्यांचा उपयोग आता पुणे पोलिसांकडून प्रबोधनासाठी करण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलिस आणि भारतीय कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांमध्ये जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण पुणेरी पाट्या तयार करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते या पाट्यांचे अनावरण करण्यात आले.
भारतीय कला प्रसारिणी सभेच्या मदतीने पुणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे संदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध पुणेरी पाट्या तयार केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे पोलिस आयुक्तालयातील गॅजेट रूमच्या बाहेर आणि नंतर शहरात विविध ठिकाणी या नावीन्यपूर्ण पाट्या प्रदर्शित करण्यात येणार आहेत असे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले.