पुणे- संचारबंदीचे उल्लंघन करत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 100 हून अधिक नागरिकांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
पुण्यात संचारबंदीचे उल्लंघन, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या 100हून अधिक जणांवर गुन्हे दाखल - पुणे कोरोना न्यूज
बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, चतु:शृंगी, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या सर्व नागरिकांना शिक्षा म्हणून भर रस्त्यात योगा करण्यास भाग पाडले.
बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, चतु:शृंगी, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या सर्व नागरिकांना शिक्षा म्हणून भर रस्त्यात योगा करण्यास भाग पाडले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. परंतु असे असतानाही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एकीकडे शहराच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असताना स्वतःच्या आरोग्यासाठी मॉर्निग वॉक निघालेल्या या महाभागांकडून पोलिसांनी चक्क व्यायामच करून घेतला.