पुणे -शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे. शनिवारी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात 'प्लाझ्मादाता गौरव' कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
पुणे पोलीस आयुक्तालयाकडून प्लाझ्मा डोनरर्सचा सत्कार - पुणे पोलीस प्लाझ्मा दान आवाहन
कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले आहे. शनिवारी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात 'प्लाझ्मादाता गौरव' कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त मितेश घट्टे उपस्थित होते. कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंत्रे यांच्या 9960530329 या व्हॉटस् अॅपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.
यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर, जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.