शिरूर(पुणे)- कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव थांबविण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने गेल्या तीन दिवसात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ८५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
या पथकाने केली कारवाई
शिरूर शहरातील बाजारपेठातील दुकाने व जुन्या नगर पुणे रोड पाबळ फाटा, बसस्थानक परिसर, तहसिल कचेरी रोड वर पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांबळे, उंदरे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील मोटे, बिरदेव काबुगडे, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस कॉन्सटेबल राजेंद्र गोपाळे यासह वाहतुक पोलीस व होमगार्ड यांच्या पथकाच्या साह्याने कारवाई करण्यात आली.