महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका मुलाचा आणि तरुणीचा वाढदिवस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला साजरा - पिंपरी चिंचवड कोरोना न्यूज

हिंजवडी पोलिसांनी देखील श्रावणी थोरात या तरुणीचा वाढदिस साजरा केला. बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्लला पोलिसांनी केक घेऊन जात सुखद धक्का दिला.

pune-police-celebreated-2-birthdays
एका मुलाचा आणि तरुणीचा वाढदिवस पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला साजरा

By

Published : Apr 27, 2020, 9:46 AM IST

पुणे- सध्या लॉकडाऊन असल्याने अनेक जण परदेशात अडकलेले आहेत. पिंपरी-चिंचवडचे राजीव लोचन हेदेखील अमेरिकेत अडकले असून रविवारी त्यांचा मुलगा वत्सल्यचा वाढदिवस होता. मात्र, राजीव यांनी दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना ई-मेल केला आणि मुलाचा वाढदिवस असल्याची माहिती दिली. संध्याकाळी सांगवी पोलिसांनी मुलगा राहात असलेल्या ठिकाणी अचानक जाऊन त्याला सुखद धक्का दिला आणि उत्साहात त्याचा वाढदिवस साजरा केला.

अशाचप्रकारे हिंजवडी पोलिसांनी देखील श्रावणी थोरात या तरुणीचा वाढदिस साजरा केला आहे. बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्लला पोलिसांनी केक घेऊन जात सुखद धक्का दिला.

एका मुलाचा आणि तरुणीचा वाढदिवस पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला साजरा


दिवसरात्र जनतेसाठी राबणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एका १५ वर्षीय मुलाला सुखद धक्का देत वाढदिवस साजरा केला आहे. वत्सल्यचे वडील राजीव लोचन हे अमेरिकेत असून लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. राजीव यांना मुलाचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना ईमेल करून मुलाचा वाढदिवस करावा, अशी विनंती केली. आयुक्तांनी याची खात्री करून सांगवी पोलिसांना याची माहिती दिली. रविवारी संध्याकाळी पोलिसांच्या गाड्यांचा ताफा उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे पोहचला आणि मुलाला सरप्राईज देण्यात आले. वत्सल्यला खाली बोलावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि पोलीस कर्मचारी यांच्या समक्ष वत्सल्यने केक कापून आपला १५ वा वाढदिवस साजरा केला. तर हिंजवडीत देखील अशाच प्रकारे श्रावणी थोरात या तरुणीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे.

आज दिवसभर माझा वाढदिवस असूनही असल्यासारखे वाटत नव्हते. मात्र, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सरप्राईजमुळे मी भारावून गेलो असून त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया वत्सल्यने दिली आहे. तर, सर्वसामान्य व्यक्तींनी देखील घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details