पुणे - अॅमेझॉन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी २ जणांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २४ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश गट्टे यांनी दिली आहे.
यासंदर्भात मितेश गट्टे म्हणाले की, अॅमेझॉनकडे वारंवार काही आयडीद्वारे "कॅश ऑन डिलिव्हरीचा" पर्याय निवडून वस्तू विकत घेण्यात येत होत्या. त्यानंतर ग्राहक त्या वस्तू पुन्हा कंपनीकडे पाठवत होते. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तू कंपनीला मिळतच नव्हत्या. त्यामुळे अॅमेझॉनच्या वतीने अलंकार पोलीस ठाण्यात ११ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.