महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डी एस कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना चार दिवसांची पोलीस कोठडी - डी एस कुलकर्णी बातमी

डी एस कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना पुणे सत्र न्यायालयाने सतरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल मंगळवारी परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मकरंद कुलकर्णी यांना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती.

न्यायालय

By

Published : Aug 14, 2019, 7:47 PM IST

पुणे- येथील डी एस कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना पुणे सत्र न्यायालयाने सतरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल मंगळवारी परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मकरंद कुलकर्णी यांना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली होती.

डी एस कुलकर्णी यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना चार दिवस पोलीस कोठडी

डी एस के घोटाळ्यात आरोपी असलेले मकरंद कुलकर्णी वर्षभरापासून फरार होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्या नावाने लुक आऊट नोटीस बजावली होती. त्या आधारे मकरंद कुलकर्णी यांना अटक करुन पुण्यात आनण्यात आले. पुण्याजवळ ड्रीम सीटीसाठी जमीन खरेदी करताना डमी कंपनी तयार करुन डी एसकेंच्या कुटुंबातील व्यक्तींना फायदा करुन देण्यात आला. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा डी एस के डेव्हलपर्स या कंपनीच्या संचालक मंडळावर आरोप आहे. या संचालक मंडळात मकरंद कुलकर्णी यांचाही समावेश असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details