पुणे: गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वेगवेगळ्या शकली लावून नागरिकांना हजारो रुपयांची फसवणूक सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून होत आहे. या प्रकरणी सायबर पोलीसांनी मिलन जिनेंद्र जैन रा. केदलगंज वर्कशॉप, अल्वर राजस्थान येथून अटक केली आहे. आरोपीला कोर्टामध्ये हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 22 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली असून, अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अनिल डफळ हे करत आहेत.
युटयूब चॅनलवर दिली माहिती: याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण जग करोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीमध्ये असताना, पैसे कमविण्यासाठी घरबसल्या शेअरमार्केटमध्ये पैसे लावून त्याद्वारे पैसे कमविण्याकडे सर्वसामान्य जनतेचा जास्त कल झाला होता. याच गोष्ठीचा फायदा घेवून राजस्थानमधील सायबर गुन्हयांची पंढरी समजल्या जाणा-या अलवर जिल्हामधील आरोपी मिलन जिनेंद्र जैन याने, सन २०२० मध्ये शेअर मार्केटबाबत युटयूब चॅनल चालू केले. त्याद्वारे सुरवातील सर्वसामान्य लोकांना शेअरमार्केटचे धडे देवून व शेअर मार्केटमध्ये पैसा कसा कमवायचा याबाबत सांगून त्याचे सबस्क्रायबर वाढविले.
चॅनलवर ४० हजार सबस्क्रायबर:आरोपी मिलन जैन याचे तब्बल ४० हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर, लोकांना शेअरमार्केटमध्ये त्याची कंपनी ट्रेडिंग विंथ ए प्रो या कंपनीच्या माध्यमातून त्याच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात नफा मिळवून देतो असे सांगून, पुण्यामधील गुंतवणूकदार याची सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. सिंहगड रोड येथे राहणारे रणवीर राजेंद्र जाधव यांची फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नोद करण्यात आला होता.