पुणे - देशासह राज्यात सध्या लोकडाऊन आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी आतापर्यंत संचारबंदी आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनाकारण घराबाहेर पडल्याप्रकरणी १ हजार २८७ नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर तर जे नागरिक बाहेर पडले आहेत, त्यांची १ हजार ५१६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त, तेराशे नागरिकांना नोटीस - कोरोना न्यूज पुणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत संचारबंदीचा आदेश भंग केल्याप्रकणी ३८२ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड हजार वाहने जप्त
पुण्यातील स्वारगेट चौकात जे विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्या नागरिकांच्या गाड्या ठेवून घेऊन, त्यांना घरी पाठवले जात आहे. नाही तर एक दोन तास त्यांना बसवून ठेवलं जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांनी काळजी घ्यायला हवी. तसेच यादरम्यान गुन्हे दाखल झाले तर भविष्यात याचा परिणाम गुन्हा दाखल होणाऱ्या नागरिकांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण लॉकडाउन काळात बाहेर फिरलात तर पोलीस कारवाई करणार आहेत.