पिंपरी-चिंचवड (पुणे) - सामाजिक सुरक्षा पथकाने देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेली दोन हजार दोनशे लिटर गावठी दारू छापा मारून जप्त केली. याप्रकरणी ज्योती अविनाश मारवाडी (वय ३०, रा. दत्तवाडी रस्ता, नेरे) आणि तिच्या दोन महिला साथीदारांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : देव्हाऱ्याच्याखाली आढळला दोन हजार लिटर दारूसाठा - पिंपरी-चिंचवड पुणे पोलीस कारवाई
देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेली दोन हजार दोनशे लिटर गावठी दारू छापा मारून जप्त केली. याप्रकरणी ज्योती अविनाश मारवाडी (वय ३०, रा. दत्तवाडी रस्ता, नेरे) आणि तिच्या दोन महिला साथीदारांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना दत्तवाडी, नेरे येथे आरोपी मारवाडी हिने घरात दारूसाठा करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने छापा मारून देव्हाऱ्याखाली लपवून ठेवलेले दारूचे 63 बॅरल जप्त केले. दारूसाठा करण्यासाठी आरोपी मारवाडी हिने घरातच एक टाकी बांधली होती. याबाबत पोलिसांना संशय येऊन नये, यासाठी टाकीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी देवाचे फोटो असलेला देव्हारा ठेवला होता. मात्र, पोलिसांकडे पक्की माहिती असल्याने मारवाडीचे बिंग फुटले आणि चेंबरमध्ये उतरून दारूचे बॅलर बाहेर काढण्यात आले.