पुणे -महाराष्ट्र आणि गोव्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसह गोव्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज - Maharashtra
४ आणि ५ एप्रिलला महाराष्ट्र आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर गेल्या चोवीस तासात अमरावती जिल्ह्यातील तापमान राज्यात सर्वाधिक ४३ डिग्री सेल्सिअस इतके असल्याचे निरीक्षणही पुणे वेधशाळेने नोंदवले आहे.
![महाराष्ट्रसह गोव्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2904088-687-3d7690ad-da53-471a-9d47-824d32aa31e1.jpg)
पुणे वेधशाळेने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन हवामान वृत्तानुसार, गेल्या २४ तासांमध्ये गोवा आणि महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे होते. मात्र, विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. त्याप्रमाणेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते.
दरम्यान, ४ आणि ५ एप्रिलला महाराष्ट्र आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर गेल्या चोवीस तासात अमरावती जिल्ह्यातील तापमान राज्यात सर्वाधिक ४३ डिग्री सेल्सिअस इतके असल्याचे निरीक्षणही पुणे वेधशाळेने नोंदवले आहे.