पुणे- घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गरीब विद्यार्थी आई-वडिलांना हातभार लावण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करतात. पण, अशाही परिस्थितीत या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ काही शांत बसू देत नाही. त्यामुळे, काम झाल्यानंतर ते रात्रशाळेत धाव घेतात. शिक्षणाच्या ओढीने दिवसा काम आणि रात्री शाळा अशी तारेवरची कसरत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरस्वती मंदिर संस्थेच्या पुणा नाईट हायस्कुलने 'सायकल बँक' हा उपक्रम सुरू केला आहे.
पुणा नाईट हायस्कूलचा अभिनव उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'
शाळेत येणारे बहुतांश मुले पायीच ये-जा करतात. त्यातूनच मग पुढे ही 'सायकल बँक' कल्पना अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सायकली मिळत आहे.
पुण्यातील या रात्रशाळेला शंभर वर्षे झाली आहेत. सध्या या शाळेत आठवी ते बारावी अशी पाचशेहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत बहुतांश मुले ही ग्रामीण भागातील आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दिवसभर लहान-सहान कंपन्या आणि दुकानात ही मुले काम करतात. मुलांना कामाचा मोबदलाही तुटपुंजा मिळतो. तरी देखील दिवसभार काम करून ही मुले रात्री शाळेत येतात. यातील बहुतांश मुले पायीच ये-जा करतात. त्यातूनच मग पुढे ही 'सायकल बँक' कल्पना अस्तित्वात आली. या योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी सायकली मिळत आहे. गरज पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना या सायकली वापस कराव्या लागतात जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभा घेता येतो. या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे.
हही वाचा-वर्गमित्रांनीच विद्यार्थ्याला बदडले, वर्गात प्रश्नांची उत्तरे देतो म्हणून मारहाण केल्याचा आरोप