महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raksha Bandhan 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचं मणिपुरातील नागरिकांना रक्षाबंधननिमित्तानं मोठं गिफ्ट - शहराध्यक्ष प्रशांत जगताप

रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसनं मणिपूरच्या नागरिकांना मोठं गिफ्ट दिलंय. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मणिपूरच्या नागरिकांसोबत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. तसंच राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांनी तेथील जनतेला मोठं गिफ्ट दिलंय.

Raksha Bandhan
Raksha Bandhan

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 3:49 PM IST

पुणे : देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेल्या या रक्षाबंधन सणाला अनेक लोक आपल्या बहिणींकडून राखी बांधतात, तसंच बहिणींना भेट वस्तूही देतात. पुण्यातील शरद पवार गटाचे नेते, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मणिपूर राज्यात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. जगताप यांनी तेथील जनतेला रक्षाबंधन निमित्तानं मदत देखली केली.

रक्षाबंधनानिमित्त तेरापूरला राष्ट्रवादीची मदत : यावेळी प्रशांत जगताप यांनी म्हटलं की, मी आज मणिपूरमध्ये माझ्या जीवनातील अत्यंत संवेदनशील सामाजिक कार्य करण्यासाठी आलो आहे. पुणेकरांच्या वतीनं येथील दोन गावांना तसंच दोन पुनर्वसन केंद्रांना आम्ही मदत करत आहोत. विशेषतः महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून 1 महिन्याचं अन्नधान्य, प्रत्येकासाठी नवीन कपडे, औषधी इतर भेटवस्तू देऊन रक्षाबंधन साजरं करण्यात येत आहे. आपण सर्व भारतीय मणिपूरच्या जनतेसोबत आहोत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते एक वेगळीच रक्षाबंधनाची भेट मणिपूरमधील नागरिकांना देऊ शकतात, हा संदेश देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे.

आपत्तीग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप : मणिपूरमधील तेरापूर इथं आम्ही आपत्तीग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. तसंच येथील महिला भगिनींसोबत आम्ही रक्षाबंधन सण साजरा केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी आम्ही मणिपूरला भेट दिल्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या कार्यकर्त्यांनी तसंच मित्र परिवार, कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात मणिपूराला मदत निधी दिला. या मदत निधीतून तेरापूर गावामध्ये धान्य, कपडे तसंच जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं, अशी महिती जगताप यांनी दिली आहे.

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची :जीवनावश्यक वस्तूंचं वाटप झाल्यानंतर तेथील महिला भगिनींनी आम्हाला राखी बांधून आमचं औक्षण केलं. निश्चितच भाऊ म्हणून मणिपूरमधील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची सर्वांची आहे. आम्ही महाराष्ट्रात राहात असलो, तरी मणिपूरमधील महिला भगिनींसाठी आमच्यासारखे हजारो भाऊ पुढील काळात मदत कार्यामध्ये अग्रेसर असतील. रक्षाबंधन निमित्तानं आम्हाला हा संदेश देता आला याचं देखील समाधान असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Raksha bandhan 2023 : झाडांना इको फ्रेंडली राखी बांधत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश...
  2. Raskasha bandhan 2023 : सीमेवर देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी पाठविल्या ५ हजार राख्या; शाळेचा स्तुत्य उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details