पुणे - महानगरपालिका परिसरातील नागरिक सर्व्हेक्षण, नागरिकांची आरोग्य तपासणी आणि जनजागृतीकरिता मनपाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकातील कर्मचारी घरोघरी जावून नागरिकांना मार्गदर्शन करतात. घरातील व्यक्तींची माहिती, थंडी, ताप, खोकला व कोरोना विषाणू प्रादुर्भाव संशयित रुग्ण, बाधित लक्षणे, याबाबत मार्गदर्शन करणे. तसेच विलगीकरण, विलगीकरणाच्या कालावधीत घायव्याची काळजी, याकरिता मनपाने केलेल्या सोयी सुविधा, परदेशी प्रवास करून घरी आलेली व्यक्ती, परदेशी व्यक्तींच्या घरी कामास जाणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, घरी करावयाचे विलगीकरण, मनपाने विलगीकरण्याकरिता केलेल्या व्यवस्था, अशा विविध माहितीसह मार्गदर्शन केले जात आहे.
"डॉक्टर आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत पुणे पालिका, भारतीय जैन संघटना आणि टाटा मोटर्स यांच्या एकत्रित सहभागाने पालिका परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या उपक्रमांतर्गत शहराच्या विविध भागात मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या साहाय्याने १२ व्हॅन फिरत आहेत, प्रत्येक व्हॅन सह १ डॉक्टर,१ नर्स, १ रेडिओग्राफर, २ कर्मचारी आहेत.