पुणे- लोणावळ्याजवळील पुणे-मुंबई दृतगती मार्ग हा धुक्यात हरवला होता. यामुळे वाहनचालकांना समोरील दृश्य पाहण्यासाठी हेडलाईट लावावे लागत होते. धुक्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. परतीचा पाऊस गेल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून लोणावळ्यात दवबिंदू पडत आहे.
पुणे-मुंबई दृतगती मार्ग हरवला धुक्यात; वाहन चालकांची तारांबळ - pune mumbai highway fog on road news
आज पहाटेपासून काही वेळ लोणावळा परिसरात गुलाबी थंडी आणि धुके होती. पहाटेच्या सुमारास दोन्ही महामार्गावरून अवजड वाहने जातात. परंतु, वाहन चालकांना काहीशी कसरत करावी लागल्याचे आज पाहायला मिळाले.
आज पहाटेपासून काही वेळ लोणावळा परिसरात गुलाबी थंडी आणि धुके होती. पहाटेच्या सुमारास दोन्ही महामार्गावरून अवजड वाहन जातात. परंतु, वाहन चालकांना काहीशी कसरत करावी लागल्याचे आज पाहायला मिळाले. दाट धुक्यामुळे वाहनांचे हेडलाईट देखील निकामी ठरले. त्यामुळे, काही वेळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. दरम्यान, धुक्यामुळे वाहतूक मंदावली असली तरी गुलाबी थंडीमुळे लोणावळ्याच्या पर्यटनात वेग येईल, अशी आशा आहे.
हेही वाचा-अयोध्येचा निकाल एका पक्षाचा जय नसून संविधानाचा विजय - माजी न्यायमूर्ती सावंत