पुणेMNS :पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनसे नेते वसंत मोरे यांंनी सिद्धार्थ बहुउद्देशीय सोसायटीचं कार्यालय फोडलंय. छत्तीसगड येथील एका जोडपं पुण्यात पळून आलं होतं. तेव्हा एका मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुलीला पाच दिवस कोंडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, महिना उलटूनही आरोपींना अटक न झाल्यानं मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले. वसंत मोरे यांनी आज आरोपींच्या मालकीच्या कार्यलयात तोडफोड केलीय.
तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल :पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी अनिल पवार, तसंच कमलेश तिवारी अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलगी दहावीत शिकत असून ती तिच्या प्रियकरासोबत पुण्यात आली होती. त्यावेळी तिघांनी या जोडप्याला पकडून पोलिसांकडं नेलं होतं. पोलीस कर्मचारी अनिल पवार यांनी त्यांना बराच वेळ त्यांना डांबून ठेवलं होतं. यानंतर पोलीस कर्मचारी पवार यांनी अल्पवयीन मुलगी, तिच्या प्रियकराला इमारतीतील एका खोलीत नेलं. यानंतर त्यानं मुलीला वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या वडिलांनी पुण्यात येऊन मुलीची सुटका केली होती.