महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

PM Modi on Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन; पंतप्रधानांनी शाळकरी मुलांबरोबर केला मेट्रोतून प्रवास - पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोतून प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहे. ( PM Modi on Pune Visit ) आज शहरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ( Varius Developments Projects inaugration by PM Modi ) पुणे शहरातही महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.

Pune Metro Project inaugration by PM Narendra Modi
पंतप्रधानांनी शाळकरी मुलांबरोबर केला मेट्रोतून प्रवास

By

Published : Mar 6, 2022, 1:22 PM IST

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहे. ( PM Modi on Pune Visit ) आज शहरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ( Varius Developments Projects inaugration by PM Modi ) पुणे शहरातही महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ( Pune Metro Project inaugration by PM Modi ) यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गरवारे स्टेशन ते आनंदनगर मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला. ( PM Modi Travelled in Pune Metro ) यावेळी त्यांनी पुण्यातील कामयानी संस्थेतील दिव्यांग तसेच शाळकरी मुलींबरोबर बातचीत केली. ( PM Modi Travelled in Pune Metro with childrens ) या संस्थेतील 10 मुलं मुली हे उपस्थित होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.

32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प -

सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे.

हेही वाचा -PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी केली आणि तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आदी मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details