पुणे -पुणेकरांची बहुप्रतिक्षित मेट्रो लवकरच प्रवासासाठी उपलब्ध होणार ( Pune Metro Start ) आहे. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेट्रो कडून पुणेकरांना भाडे तत्वावर ई- सायकली मिळणार ( Pune Metro E Cycle ) आहेत. गरवारे मेट्रो स्टेशन जवळ हे सायकल स्टँड ( Garware Metro Stattion Pune ) असून, सध्या येथे दहा सायकल उपलब्ध आहेत. याबाबत पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट जनरल मॅनेजर हेमंत सोनवणे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.
हेमंत सोनवणे म्हणाले, या सायकली युनो बाईक आणि माय बाईक या दोन कंपन्यांच्या आहेत. ॲपद्वारे या सायकली ऑपरेट होत असून, त्यांना प्रति तास पाच रुपये भाडे आहे. नागरिकांना याचा साप्ताहिक, मासिक किंवा दीर्घकालीन पास देखील काढता येऊ शकतो. या सायकलींचा मेंटेनन्स खर्च सदर दोन्ही कंपन्या करणार आहेत. कंट्रोल सेंटरमध्ये सायकल कोठे आहे कोणती सायकल खराब झाली आहे, याची माहिती मिळते.