महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Metro: पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला पायलट, जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी यश - मेट्रो रेल्वे

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्याला स्त्री शिक्षण चळवळीचा इतिहास आहे. पेठाचे शहर म्हणून ओळख असणारे पुणे शहर आता मेट्रो शहर झाले आहे. या मेट्रोची दोरी सुद्धा आता महिलांच्या हातात आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पुणे मेट्रोमध्ये तब्बल नऊ महिला लोको पायलट आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

Woman Loco Pilot
महिला लोको पायलट

By

Published : Aug 6, 2023, 1:02 PM IST

महिला लोको पायलटची प्रतिक्रिया

पुणे :पुणे मेट्रोचे स्टेअरिंग महिलांच्या हाती आले आहे. राज्यातील ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेऊन या मुली इथपर्यंत आलेल्या आहेत. स्त्रियांना शिक्षण देणारे पुणे अशी ओळख इतिहासात महाराष्ट्राला होती. हेच पुणे आता आधुनिक होत आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. तसेच पुण्यात आता मेट्रो रेल्वेचे जाळे तयार झालेले आहे. त्यामुळे शहराचे स्वरूप बदलत आहे, परंतु इतिहासाचा पिंड मात्र तसाच ठेवून हे शहर पुढे चालत असल्याचे दिसत आहे.

महिला म्हणून अभिमानाची गोष्ट :साताऱ्याहून आलेल्या अपूर्वा अल्लटकर ह्या महिला पायलट आहे. 24 फेब्रुवारी 2023 त्यांची निवड पुणे मेट्रो पायलट म्हणून झाली. दहावीपर्यंत शिक्षण सातारा झाल्यानंतर मेकॅनिकल डिप्लोमा सोलापूरमध्ये केला. त्यानंतर इंजीनियरिंगची पदवीही घेतली. आता मेट्रोमध्ये रुजू झाल्या. मेट्रो चालवतानाचा एक वेगळा अनुभव आहे. आपले सर्वत्र कौतुक होते, याचाही त्यांना खूप अभिमान आहे. आई-वडिलांना सुद्धा खूप आनंद होत आहे. ही एक महिला म्हणून अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.


स्वतःवरच खूप अभिमान :पुण्यातून चाकण भागात राहत असलेली शेरमिन शेख यांची निवड झालेली आहे. कुठलीही गाडी चालवता येत नसलेली ही मुलगी आज मेट्रो चालवत आहे. याचा त्यांना खूप अभिमान आहे. सुरुवातीला खूप भीती वाटली. परंतु, ज्या वेळेस मी धाडस करून एवढे प्रवासी घेऊन मेट्रो चालविली, तेव्हा आपण यशस्वी झालो, याचा स्वतःवरच खूप अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया शेरमीन शेख यांनी दिलेली आहे.


ड्रायव्हिंगची आवड म्हणून मेट्रोची निवड :पल्लवी शेळके या नाशिकच्या आहेत. संगमनेर येथील इंजीनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर त्यांनी फॉर्म भरला. पल्लवी शेळके यांना पहिल्यापासून ड्रायव्हिंग करायची आवड होती. त्यात आणखी एखादी ड्रायव्हिंगची आवड म्हणून मेट्रोची निवड केली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी पहिल्यांदा मेट्रो चालवली. प्रथम चालवत असताना त्यांच्या मनात एक भीती होती. त्यांचे वडील शिक्षक आहेत. आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता.



हेही वाचा :

  1. Pune Metro Expansion: पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचे 1 ऑगस्टला नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
  2. Pune Metro: मेट्रोच्या भूमिगत मार्गातून ट्रेनची चाचणी! भुयारी मार्गातून सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत मेट्रो धावली
  3. Pune Metro Line : राहिलेल्या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details