पुणे - मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यातील स्वारगेट चौकाजवळ कृषी महाविद्यालय ते स्वारगेट यादरम्यान मेट्रोसाठी भुयारी मार्गाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या मेट्रोच्या कामादरम्यान ५७ मीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग सापडले आहेत.
दरम्यान, सोमवारी उद्योगनगरीत दाखल झालेले मेट्रोचे डबे रूळावर चढविण्यात आले होते. पिंपरीतील वल्लभनगरपासून काही अंतरापर्यंत या मेट्रोची 'ट्रायल रन' ही घेण्यात आली होती. यावेळी बहुप्रतीक्षेत असलेली या मेट्रोची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी शहरवासियांनी रसत्याच्या कडेला गर्दी केली होती.
ट्रायल रनचे डबे रुळावर बसविताना जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळी बंद ठेवण्यात आली होती. महाकाय क्रेनच्या सहाय्ययाने डबे रुळावर चढविण्यात आले. मेट्रोचा डबा ४० टन वजनाचा व २० मीटर लांब आहे. काही वेळ मेट्रोच्या डब्यांची चाचणीही घेण्यात आली होती.