महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murlidhar Mohol Tested Corona Positive : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह - मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागणी

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ( Pune Mayor Corona Positive ) झाली असून त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. पुणे शहरात बुधवारी समोर आलेल्या अकडेवारीनुसार ४४ हजार ४५२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट
मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट

By

Published : Jan 27, 2022, 3:41 PM IST

पुणे- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ( Murlidhar Mohol Tested Corona Positive ) झाली असून त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. मला कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल, असे यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

४४ हजार ४५२ सक्रिय रुग्ण

पणे शहरात बुधवारी (दि. २७ जानेवारी) ५ हजार ५२१ नव्या कोरोनाग्रस्तांची ( Pune Corona Update ) वाढ झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात बुधवारी समोर आलेल्या अकडेवारीनुसार ४४ हजार ४५२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details