महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक कार्यक्रम टाळा, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन - muralidhar mohol appeal on year end party

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत. खासगी ठिकाणांसह बागा, उद्याने, हॉटेल, रेस्टॉरंटसारख्या ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. कोरोनाची साथ असल्याने खबरदारी म्हणून काळजी घेण्याचा सल्लाही मोहोळ यांनी यावेळी दिला.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ आवाहन
महापौर मुरलीधर मोहोळ

By

Published : Dec 22, 2020, 8:03 PM IST

पुणे - नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांनी सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत. खासगी ठिकाणांसह बागा, उद्याने, हॉटेल, रेस्टॉरंटसारख्या ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. कोरोनाची साथ असल्याने खबरदारी म्हणून काळजी घेण्याचा सल्लाही मोहोळ यांनी यावेळी दिला.

महापौर मुरलीधर मोहोळ आवाहन
दरवर्षी 'थर्टी फर्स्ट' निमित्त होतात कार्यक्रमशहरात दरवषी 'थर्टी फर्स्ट' निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरातील विविध रस्त्यांवर नववर्षाच्या स्वागतासाठी तरुण-तरुणी थर्टी फर्स्टच्या दिवशी मध्यरात्री गर्दी करून पार्टी करतात. मात्र, यंदा कोरोनाची साथ असल्याने पुणेकरांनी थर्टी फर्स्ट' निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन घेऊ नये असे, आवाहन महापौर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे.पुण्यातही रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागूब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहण्यासाठी पुण्यातही रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आपल्या पुणे महानगरपालिका हद्दीतही या संचारबंदीची अंमलबजावणी होत आहे. पुणेकरांनी याची नोंद घ्यावी !’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details