पुणे - मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला आणि कांदा बटाटा मार्केट, शुक्रवार 20 मार्च आणि शनिवार 21 मार्चला बंद ठेवण्यात येणार आहे, कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डमधील आडते असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
पुणे मार्केट यार्डमधील फळे-भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट २ दिवस बंद कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून राज्यभरातील वर्दळीची ठिकाणे बंद करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मार्केटयार्डमधील आडते असोसिएशन आणि दोन्ही कामगार संघटना यांची तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत बंदचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे.
हेही वाचा -कोरोना प्रभाव: संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच दर्शनासाठी बंद
२० आणि २१ मार्चला, फळे-भाजीपाला आणि कांदा-बटाटा बाजार हे संपूर्णपणे बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यापासून दर बुधवार आणि दर शनिवार असे ३१ मार्च २०२० पर्यंत संपूर्ण बाजार स्वच्छतेकरता बंद राहणार आहे. याची सर्व संबंधित बाजार घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा -BREAKING : पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला; राज्यातील संख्या ४२ वर