पुणे- मार्केटयार्ड सलग दुसऱ्या दिवशीही पूर्ववत सुरू झाले आहे. आज बाजारात कांदा, बटाटा आणि फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. पुण्यातील मार्केट यार्डला 283 गाड्यांची आवक झाली असून 14 हजार क्विंटल फळे, कांदा आणि बटाटा याठिकाणी विक्रीसाठी आला आहे. तर, मोशी, मांजरी आणि खडकीमध्ये मिळून 538 गाड्यातून एकूण 17480 क्विंटल आवक झाली.
पुण्याील मार्केटयार्ड सलग दुसऱ्या दिवशी सुरू, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
रविवारी बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक झाली. त्यानंतर आज फळ आणि कांदा बटाट्याचे मार्केट सुरू झाले आहेत. यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात आल्या.
रविवारी बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक झाली. त्यानंतर आज फळ आणि कांदा बटाट्याचे मार्केट सुरू झाले आहेत. यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात आल्या. मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यासाठी उपययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, याठिकाणी नेहमीप्रमाणे होणारी गर्दी दिसत नाही. आठवडाभर दिवसाआड हा बाजार सुरू राहणार आहे.
पहाटे चार वाजता शेतमाल उतरवल्यानंतर वाहन चालक, कामगार बाहेर गेले. त्यानंतरच अडते खरेदीदार आणि कामगार यांना प्रवेश देण्यात आला. अशा पद्धतीने नियोजन केल्याने मार्केटमधील जी नेहमीची गर्दी आहे, ती कमी झालेली आहे. त्याच बरोबर सोशल डिस्टन्स ठेवत सर्व खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.