महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचे गावकऱ्यांकडून समर्थन, पोलिसांच्या समर्थनात गावबंद आंदोलन - mandavgan farata police

महाविद्यालयीन मुलीच्या छेडछाडीप्रकरणी महाविद्यालयीन तरुणाला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मांडवगण फराटा गावातील गावकरी व महिलांनी एकत्र येऊन, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन करत, गावबंद आंदोलन केले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी हे चांगलं काम केले आहे. असे म्हणत, संपूर्ण गाव पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे.

मांडवगण फराटा

By

Published : Aug 18, 2019, 8:33 PM IST

पुणे - देशभरात एकीकडे 'मुलगी वाचवा देश वाचेल' असा नारा दिला जातो. तर दुसरीकडे त्याच मुलींची भर रस्त्यात छेडछाड झाल्यास, या मुली आपली बदनामी होऊ नये म्हणून घडलेल्या प्रकारावर पांघरुण टाकतात. मात्र, शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात महाविद्यालयीन तरुणीची वारंवार छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती.

मांडवगण फराटा : पोलिसांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचे गावकऱ्यांकडून समर्थन, पोलिसांच्या समर्थनात गावबंद आंदोलन

या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आणि त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेक स्तरांतून यामधील पोलिसांची वागणूक चुकीची असल्याचे बोलले जात होते. मात्र, या मारहाणीचे मांडवगण फराटा येथील महिलांनी आता समर्थन केले आहे. तसेच गावकरीही महिलांच्या आणि पोलिसांच्या मागे ठामपणे उभे राहून, गावातील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी गावबंद करुन टव्हाळखोरांच्या विरोधात आंदोलन केले.

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून नेहमीच महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन दिले जाते. त्यावेळी अनेक मुली अगदी मनमोकळ्यापणाने सर्व गोष्टी पोलिसांना सांगतात. त्यानुसार अनेक वेळा कारवाईही केली जाते. अशा प्रकरणात पोलिसांना बऱ्याचदा कठोर भूमिका घ्यावी लागते. पोलीस सामान्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून, पुढील काळातही कायद्यानुसार काम करत राहतील. असे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितले.

महिला व शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या पोलिसांच्या बाजूने आता गाव उभं राहिलं आहे. त्यामुळे, जे गाव करेल ते राव करु शकणार नाही असं म्हणत गावकऱ्यांनी टव्हाळखोरांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details