पुणे- एसटी महामंडळाने पुण्यात बससेवा नाकारल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल पासवर परवानगी मिळूनही आपापल्या गावी जाता येत नसल्याचे चित्र आहे. याआधी पुण्यातून सहा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्यातही भाडे जास्त घेण्यात येत होते. विद्यार्थ्यांसाठी गेल्या 50 दिवसांपासून काम करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आता या विद्यार्थ्यांसाठी खासगी बसची सोय करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 5 खासगी बसेसनी नगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी खासगी बसची सोय
विद्यार्थ्यांसाठी गेल्या 50 दिवसांपासून काम करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आता या विद्यार्थ्यांसाठी खासगी बसची सोय करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 5 खासगी बसेसनी नगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे.
एस.टी महामंडळाने आम्हाला बसेस उपलब्ध करून द्याव्या, अशी वारंवार आम्ही मागणी करत होतो. मात्र, महामंडळाकडून फक्त आश्वासन देण्यात आले. परंतु, आम्ही या विद्यार्थ्यांना आता खासगी बसने सोडत आहोत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली. पुणे शहरात 5 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी अडकले असून या महामंडळाला पैसे देऊन ते बस सेवा उपलब्ध करून देत नाहीत. सरकार विद्यार्थ्यांसाठी बस का पुरवत नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला.