पुणे - कोरोनाच्या संकटामुळे ओढावलेल्या लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकांनी कर्मचाऱ्यांनी सगळी कामे जबाबदारीने पार पाडली. लॉकडाऊनपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये सेवा बंद झाल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली. आजमितीस परिवहन महामंडळातून २ लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करीत असून दररोज ३० लाख रुपये उत्पन्न गोळा होत आहेत. ही संख्या टप्याटप्याने वाढेल, असा विश्वास व्यक्त करीत हे पीएमपी कर्मचाऱ्यांचे यश असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
पुणे परिवहन महामंडळाचे दररोजचे उत्पन्न 30 लाखांवर
लॉकडाऊनपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये सेवा बंद झाल्याने आर्थिक चणचण जाणवू लागली. आजमितीस परिवहन महामंडळातून २ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असून दररोज ३० लाख रुपये उत्पन्न गोळा होत आहेत.
डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, कोविड काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ३०० बसेस उपलब्ध होत्या. रेल्वेने आलेल्या कामगारांना योग्य स्थळी पोहोचविण्यासाठी देखील रेल्वे स्थानकावरुन परिवहन महामंडळाने सेवा दिली. पुष्पक आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून देखील काम केले. नेहमीपेक्षा वेगळी सेवा देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. आता परिस्थिती सुधारत असून लवकरच अधिक चांगली सेवा देऊ, असेही त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, सर्व प्रकारे प्रयत्न करुन कोविडचा प्रभाव कमी करु. तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यावर मात करु. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे हे अहोरात्र काम करीत संघटनशक्तीचे यश आहे.