महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सात महिन्यांपासून फरार आरोपीच्या बारामतीत आवळल्या मुसक्या - Baramati accuse arrest

बारामतीत गेल्या सात महिन्यांपासून फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. कोंबड्यांची गाडी अडवून चालकाकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरी प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

Baramati crime news
बारामती क्राइम न्यूज

By

Published : Oct 30, 2020, 4:08 PM IST

बारामती- दाखल गुन्ह्यातील मागील सात महिन्यांपासून फरार आरोपीस पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मदन अरुण काळे (वय 29 वर्ष, रा.जगताप मळा, शेटफळ हवेली ता. इंदापूर जि.पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आरोपी मदन विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात 394, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने कोंबड्यांची गाडी अडवून चालकाकडील रोख रक्कम आणि मोबाईल चोरी केला होता. याप्रकरणी आरोपीचा पोलीस शोध घेत होते. सदर गुन्ह्यात काळे हा गेली सात महिने फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरील आरोपीस काठी ता. इंदापूर येथील चौकात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details