पुणे - जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यावेळी जवळच असणाऱ्या शाळा, महाविद्यालयात आणि मंगल कार्यालयात नागरिकांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वांची जेवणाची व्यवस्था विविध समाजसेवी संस्था, राजकीय व्यक्तींकडून करण्यात आली आहे.
पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, समाजसेवी संस्थांनी दिला मदतीचा हात - पुण्यात अतिवृष्टी
जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कात्रज येथील तलावाची भिंत फुटल्यानंतर कात्रज, सहकारनगर, दांडेकर वस्ती, आंबील ओढा, पर्वती पायथा येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील साहित्य वाहून गेले असून रस्त्यावर देखील मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे.
मनसेचे नगरसेवक यांनी पुराचा फटका बसलेल्या लोकांची कात्रज नवी वसाहत येथे राहण्याची व्यवस्था केली. तर समाजसेवी संस्था आणि राजकीय पुढारऱयांनी त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली. शिवाय त्यांना कपडेही पुरवले आहेत.