महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिमा नदीवरील चासकमान धरण ओव्हरफ्लो; डाव्या कालव्यातुन विसर्ग सुरू - chaskaman dam overflow

भोरगिरी, भिमाशंकर परिसरात होणाऱ्या दमदार पावसाने चासकमान धरण मागील पाच दिवसातच तुडुंब भरले आहे. चासकमान धरण 99 टक्के भरल्याने धरणाच्या डाव्या कालव्यातून 250 क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

pune : khed taluka chaskaman dam overflow
भिमा नदीवरील चासकमान धरण ओव्हरफ्लो; डाव्या कालव्यातुन विसर्ग सुरू

By

Published : Aug 29, 2020, 5:10 PM IST

राजगुरुनगर (पुणे) -मागील महिन्यापासून भिमाशंकर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे भिमा व आवळा या दोनही नद्या दुथडी भरुन वाहत असून चासकमान धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. आज सकाळी चासकमान धरण ओव्हरफ्लो झाले आहे. खेड व शिरुर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण वरदान आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

चासकमान धरणाचे दृश्य...
चासकमान धरण 99 टक्के भरल्याने धरणाच्या डाव्या कालव्यातून 250 क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भोरगिरी, भिमाशंकर परिसरात होणाऱ्या दमदार पावसाने चासकमान धरण मागील पाच दिवसातच तुडुंब भरले आहे. धरणात 99.02 टक्के इतका पाणीसाठा झाला असून भीमा आणि आरळा नदीतून धरणात सरासरी 1500 क्‍युसेकने पाणीसाठा येत आहे. चासकमान धरणातील पाणीसाठा -
  • एकूण पाणी पातळी - 649.39 मीटर
    एकूण पाणीसाठा - 239.58 दशलक्ष घनमीटर
    उपयुक्त पाणीसाठा - 212.39 दशलक्ष घनमीटर
    टक्केवारी - 99.02 टक्के
    आजचा पाऊस - 4 मि.मी.
    आजपर्यंत धरणक्षेत्रातील पाऊस - 438 मि. मी.

ABOUT THE AUTHOR

...view details