पुणे- शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग नदी आणि कालव्यात सोडण्यात येत आहे. आज सकाळी जवळास ३ हजार क्युसेक पाणी सोडले.
पुणेकरांची चिंता मिटली, खडकवासला धरण १०० टक्के भरलं; ३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - पुणे
खडकवासला धरण १२ टीएमसी भरले आहे. त्यामुळे नद्या आणि कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. मुठा आणि मुळा नद्यांमध्ये पाणी सोडल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ४९ ठिकाणे बाधित होण्याची शक्यता आहे.
शहराच्या आजूबाजूला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर असे चार साखळी धरणे आहेत. या चारही धरणाची एकूण क्षमता जवळपास ३० टीएमसी आहे. सध्या खडकवासला धरण १२ टीएमसी भरले आहे. त्यामुळे नद्या आणि कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. मुठा आणि मुळा नद्यांमध्ये पाणी सोडल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ४९ ठिकाणे बाधित होण्याची शक्यता आहे. अशी ठिकाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निश्चित केली आहेत. या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.