महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती

Pune ISIS Module Case : पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता‌. याबाबत दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी धक्कादायक माहिती एनआयए तपासात ( NIA Investigation ) समोर आली आहे.

Pune ISIS Module Case
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 11:05 AM IST

Updated : Nov 7, 2023, 11:21 AM IST

पुणे Pune ISIS Module Case : पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून मोठा घातपात करण्याचा इसीस दहशतवाद्यांनी कट रचला होता‌, अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात पुढं आली आहे. यासंदर्भातील सूचना इसीस दहशतवाद्यांना सिरीयामधून दिल्या जात होत्या, अशी माहिती नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याकडून तपासादरम्यान समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळं सर्वत्र एकच खळबळजनक उडाली आहे.

अधिक तपास सुरू :पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला अटक केली आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात आलमनं सदरील माहिती दिली आहे. तसंच यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

आरोपीला पकडण्यासाठी 3 लाखांचं बक्षीस : पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. दहशतवाद्यांना लपण्याचं ठिकाण म्हणून वापरण्याच्या उद्देशानं हेरगिरी करण्यात आणि अद्ययावत स्फोटकासाठी साधने (आयईडी) तयार करण्यात दहशतवादी आलमनं सक्रिय भूमिका बजावली होती. गोळीबाराचं प्रशिक्षण देण्यासाठी आलमनं सक्रिय सहभाग नोंदविल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यानं दिली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई सुरू होताच हा आरोपी 19 जुलैला पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पोलिसांनी दुचाकी चोरताना रंगेहात पकडलं होतं. त्याच्याबरोबर मोहम्मद इमरान आणि मोहम्मद युनुस साकीला पोलिसांनी अटक केली होती. एनआयनं आरोपीला अटक करण्यासाठी 3 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

एनआयएकडून सखोल तपास :आरोपींचा पुण्यातील इसिस मोड्युलमधून दहशतवादी कृत्य करण्याचा डाव होता, हे एनआयएला तपासात आढळून आलं. दहशतवादी कृत्यातून सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडवणं, हे इसिसचं उद्दिष्ट आहे. इसिसकडून सातत्यानं भारतविरोधी मोहीम राबविली जाते. तसेच देशात हिंसाचार घडवून आणण्यासाठी विविध माध्यमांतून इसिसकडून आजवर प्रयत्न करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे दहशत आणि हिंसाचार घडवण्याचा डाव उधळून लावण्यासाठी एनआयएकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचं एनआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

हेही वाचा -

  1. Pune ISIS Module : पुण्यातील दहशतवाद्यांचे इसिसशी कनेक्शन, 'ही' संघटना कशी काम करते?
  2. Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक
  3. Isis Module Case : चार वॉंटेड आरोपींवर ठेवलं लाखोंचं बक्षीस, इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयचा निर्णय
Last Updated : Nov 7, 2023, 11:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details