महाराष्ट्र

maharashtra

Pune Gram Panchayat Election: पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर

By

Published : Oct 9, 2022, 9:57 AM IST

पुणे जिल्ह्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या आणि मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Pune Gram Panchayat Election) ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. जिल्ह्यात अशा 221 ग्रामपंचायती असून त्यांची निवडणूक प्रक्रिया (Gram Panchayat Election) सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election

पुणे: पुणे जिल्ह्यातील नव्याने स्थापन होणाऱ्या आणि मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Pune Gram Panchayat Election) ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. जिल्ह्यात अशा 221 ग्रामपंचायती असून त्यांची निवडणूक प्रक्रिया (Gram Panchayat Election) सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या ग्रामपंचायचींमध्ये जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील 28, भोरमधील 54, दौंडमधील 8, बारामतीमधील 13, इंदापुरातील 26, जुन्नरमधील 17, आंबेगावमधील 21, खेडमधील 23, शिरूरमधील 4, मावळातील 9, मुळशीतील 11 आणि हवेलीतील 7, अशा एकूण 221 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असे जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले आहे.

प्रभागनिहाय मतदार यादी: या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. तसेच निवडणुकींसाठी संगणकप्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. अंतिम मतदार यादी २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details