महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पदवीधर निवडणूक : मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जिवे मारण्याची धमकी - Graduate election MNS Rupali Patil

पुण्यात मनसेतर्फे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाग घेणाऱ्या रुपाली पाटील यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाटील यांना फोनवरून धमकी देणारी व्यक्ती सातारा येथील असल्याचे सांगण्यात येत असून, लबाडे असे संबंधित व्यक्तीचे आडनाव आहे.

MNS candidate Rupali Patil news
मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील

By

Published : Nov 21, 2020, 8:25 PM IST

पुणे -पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होणार आहे. उमेदवार निवडीपासूनच निवडणुकीतील रंगत वाढली होती. त्यात मनसेच्या रुपाली पाटील यांनी उमेदवारी दाखल करत तगडे आव्हान निर्माण केले. मात्र, आता रुपाली पाटील यांना थेट जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादीसह इतर पक्षांतील उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. अशात मनसेच्या रुपाली पाटील यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली. मात्र, त्यांना जिवे मारण्याची धमकी आल्याने पदवीधर निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. तू जिथे असशील तिथे संपवून टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस, अशी धमकी रुपाली पाटील यांना फोनवरून देण्यात आली आहे. याबाबत रुपाली पाटील यांनी तातडीने पोलिसांना कळवले.

धमकी देणारी व्यक्ती साताऱ्याची

रुपाली पाटील यांना फोनवरून धमकी देणारी व्यक्ती सातारा येथील असल्याचे सांगण्यात येत असून, लबाडे असे संबंधित व्यक्तीचे आडनाव आहे. आता पोलीस याबाबत काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. दरम्यान, यंदाच्या पुणे पदवीधर निवडणुकीची चांगलीच चर्चा आहे. या मतदारसंघात भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांच्यात चुरशीची लढत आहे. यात मनसेच्या रुपाली पाटील, जनता दलाचे शरद पाटील यांनी आव्हान निर्माण केले आहे. तसेच, इतर ६०पेक्षा ज्यास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हेही वाचा -व्यापारी शहा आत्महत्या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details