पुणे -विमानतळ परिसरात विदेशी (युगांडा) तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात धानोरीजवळच्या मैदानात तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीने दोन जणांविरोधात विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा साड्यांच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. कामावरुन घरी जाण्यासाठी लिफ्ट मागितल्यानंतर लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीने मित्राला बोलावून धानोरीजवळच्या मैदानात सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. पीडित तरुणीने स्वत: पहाटेच्या सुमारास विमानतळ पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार दोन आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच लिफ्ट देण्यासाठी वापरलेली कार शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - आणखी एक नकोशी! पुण्यात कचऱ्याच्या डब्यात आढळले जीवंत अर्भक