पुणे -महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश उत्सव संयमाने साजरा केला जाईल, अशी भावना पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे. तसेच पूरग्रस्तांना आर्थिक मदत, गाव दत्तक यांसारखे उपक्रमही काही गणेश मंडळ राबवत आहेत.
महापुराचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करणार; पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका
राज्यावर दुःखाचे सावट असले तरी परंपरा जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. मात्र, तो साजरा करताना परिस्थितीचे भान ठेवले जाईल, अशी भूमिका पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वाडेश्वर कट्टा याठिकाणी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केली.
राज्यावर दुःखाचे सावट असले तरी परंपरा जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. मात्र, तो साजरा करताना परिस्थितीचे भान ठेवले जाईल, अशी भूमिका पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी वाडेश्वर कट्टा याठिकाणी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केली. पुण्यातील गणेशोत्सव हा आकर्षक देखावे आणि विसर्जन मिरवणुकांसाठी प्रसिद्ध आहे. प्रमुख मंडळांकडून यावर्षीदेखील उत्साहाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पुण्यातील वाडेश्वर कट्टा याठिकाणी दर बुधवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र करून त्यांची भूमिका समजावून घेतली जाते. यावेळी पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी, गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या रहदारीच्या समस्या, मंडळांची शिस्त, व्यवस्थापन यांसारख्या विषयांवरदेखील चर्चा करण्यात आली.